डिजिटल मीडियाचे पदवी शिक्षण काळाची गरज

BA in Digital Media MGM University, Aurangabad

काळ बदललाय, काळासोबत माणसंही बदलली आहेत आणि यात आणखी एक मोठा बदल झाला आहे तो म्हणजे तंत्रज्ञानात. आता सर्वत्र डिजिटलचे वारे वाहत आहेत. कधी एकेकाळी जेवणासाठी हॉटेलमध्ये झुंबड असायची. आता खाद्य होम डिलिव्हर व्हायला लागले आहे. खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी उसळायची. आता हवी तशी आणि हव्या त्या प्रमाणात ई-शॉपिंग साईट्सवरून घरपोहोच खरेदी करता येऊ लागली आहे. आधी बँकांमध्ये जाऊन रांगा लावून आर्थिक व्यवहार करावे लागायचे, आता एका अॅपवरून क्षणार्धात हे व्यवहार पूर्ण होऊ लागले आहेत. आधी मनोरंजनासाठी टीव्ही, वर्तमानपत्रे, पुस्तके असायची आणि त्यासाठी सोईनुसार वेळ काढावा लागायचा. आता मोबाईल, ईपेपर, ईबुक्स आलीत. त्यामुळे आपल्या सोईनुसार ते सर्व डिजिटल रुपात वापरता येऊ लागली आहेत. इतरांच्या ख्यालीखुशालीसाठी, कार्यालयीन कामकाजासाठी आधी पत्रव्यवहार व्हायचा. आता ईमेल्स, सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद होऊ लागला आहे. एकंदरीतच काय तर माणसाच्या जीवनशैलीशी तसेच रोजच्या गरजांशी निगडीत जवळपास सर्वच गोष्टी डिजिटल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे, या डिजिटल युगासोबत आपणही डिजिटल होणे, काळाची गरज बनले आहे. मात्र, वापरकर्ता म्हणून डिजिटल होणे नव्हे तर निर्माता म्हणून डिजिटल होण्याची अधिक गरज आहे. निर्माता म्हणून डिजिटल बाबींकडे बघितल्यास त्यात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होताना दिसून येतील. त्या डिजिटल माध्यमांसाठी मजकूर लेखन, संपादन, जाहिरात, धोरणात्मक आखणी, विविध सॉफ्टेवअर निर्मिती आणि त्यांचे व्यवस्थापन, ब्रँडींग तसेच विपणन आदींशी निगडीत असू शकतात. मात्र, कोणत्याही संधीला रोजगारात योग्यप्रकारे परावर्तित करण्यासाठी आपल्याकडे काही कौशल्ये असणे आवश्यक असते आणि ही कौशल्ये अवगत करण्यासाठी आपल्याकडे योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रितसर पदवी असावी लागते. याच हेतूने नव्या काळातील डिजिटल मीडियाच्या शिक्षणासाठी एमजीएम विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. एमजीएम विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच बी.ए डिजिटल मीडिया हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या तीनवर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बी.ए डिजिटल मीडिया अभ्यासक्रमाची गरज काय?
      सध्या माध्यम क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. अनेक वर्तमानपत्र, मासिके, वृत्तवाहिन्या त्यांच्या डिजिटल आवृत्तींवर भर देऊ लागले आहेत. कारण, त्यांचा बहुतांश वाचक आणि प्रेक्षकवर्ग हा इंटरनेटआधारीत माध्यमे म्हणजेच वेबपोर्टल, ईपेपर, सोशल मीडिया, ऑडिओ-व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सकडे वळला आहे. त्यामुळे, डिजिटल मीडियामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. डिजिटल मार्केटींग, ब्रँडिंग किंवा कंटेट रायटींगसाठी उत्तम वेतन मिळत आहे. त्यामुळे या बदलत्या माध्यमाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे, या हेतूने एमजीएम विद्यापीठात बी.ए. डिजिटल मीडिया हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमात काय शिकता येईल?    
      बी.ए. डिजिटल मीडिया या अभ्यासक्रमातून इंटरनेटबद्दल ज्ञान, डिजिटल फोटोग्राफी, क्रिटीकल थिंकिंग, मजकुर निर्मितीची धोरणे आणि निर्मितीप्रक्रिया, वापरकर्त्यांच्या वर्तनाचा अभ्यास, सीएमएस, सोशल मीडिया, व्हिडिओ प्रॉडक्शन, डिजिटल मार्केटींग, डिजिटल कॅम्पेनिंग, 2डी अॅनिमेशन, डिजिटल जनसंपर्क आणि ब्रँडींग, वेब डिझायनिंग, 3डी मॉडेलिंग आणि अॅनिमेशन, मोबाइल अॅप अँड डेव्हलपमेंट, स्क्रिप्ट रायटींग, अँकरिंग अशा अनेक महत्वपूर्ण विषयांचे ज्ञान मिळेल. याचा फायदा प्रत्यक्ष कामकाजात होईल.

बी.ए. डिजिटल मीडिया पदवीनंतर रोजगाराच्या संधी कोणत्या?   
      बी.ए. डिजिटल मीडियाची पदवी घेतल्यानंतर डिजिटल मीडिया मॅनेजर, वेब मॅनेजर, ब्रॉडकास्टर, स्क्रिप्ट रायटर, डिजिटल मार्केटींग मॅनेजर, डिजिटल कॅम्पेनर, वेब डिझायनर, मीडिया स्ट्रॅटेजिस्ट, कंटेंट व्हिज्युलायझर, सोशल मीडिया इन्फ्लूयएन्सर आदी पदांवर काम करता येऊ शकते. यासाठी सरकारी कार्यालये, नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळू शकतो किंवा स्वतंत्रपणेही व्यवसाय करता येऊ शकतो.

 एमजीएम जर्नालिझम कॉलेजच का निवडावे?    
      एमजीएम जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन कॉलेज हे पत्रकारितेचे शिक्षण देणारे देशातील अग्रगण्य महाविद्यालय आहे. आजवर येथे शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देशविदेशातील वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ, शासकीय जनसंपर्क विभाग, जाहिरात विभाग, जाहिरात संस्था, डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. डिजिटल मीडियाच्या शिक्षणासाठी आवश्यक स्टुडिओ, कॉम्प्युटर लॅब, सॉफ्टवेअर्स, कॅमेरा, तज्ञ प्राध्यापकवर्ग याठिकाणी उपलब्ध आहे. सोबतच, देशविदेशातील तज्ञांचे वर्कशॉप, सेमिनार या ठिकाणी नियमितपणे होत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. शिवाय, डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या देशातील अग्रगण्य माध्यम समुहांशी, डिजिटल पोर्टलशी हे महाविद्यालय करारबद्ध असल्याने विद्यार्थ्यांना त्यात थेट संधी मिळते.  

प्रवेशासाठी संपर्क कुठे साधावा?    
एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, एमजीएम विद्यापीठ, एन-6, सिडको, औरंगाबाद-431003
संपर्क – 8806255507, 0240 – 2480490                  संकेतस्थळ: mgmjournalism.orgmgmu.ac.in

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *